ब्लॉगिंग विषयी सविस्तर माहिती.

0



 ब्लॉगिंग म्हणजे काय ?

नमस्कार मित्रांनो अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्लॉग म्हणजे एक प्रकारची डायरी होय जिथे आपण आपले विचार किंवा कल्पना लिहू  शकतो आणि ब्लॉगिंग च्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पाठवू शकतो.

पण इथे गोष्ट लक्षात घ्या की जसे आपण एखादी डायरी आणि त्या  डायरीत वैयक्तिक काही लेख लिहीत आहोत आणि ते लेख हे आपल्यासाठी किंवा ठराविक लोकांपर्यंतच मर्यादित आहेत किंवा ठराविक लोकच ते लेख वाचू शकतात जसे की आपले कुटुंबातील काही व्यक्ती किंवा आपले मैत्र आणि मैत्रीण  अगदी त्याचप्रमाणे इथे मात्र आपल्याला आपले लेख कल्पना किंवा विचार या आपल्याला डिजिटल स्वरूपात लिहायचे आहेत आणि हो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे डिजिटल लेख हे अमर्यादित लोकापर्यंत  ब्लॉगिंगच्या  माध्यमातून पोहोचू  शकतात. त्याच प्रकारे मित्रांनो आपण ब्लॉगिंग ही आपल्या कोणत्याही भाषेत करू शकतो जसे की हिंदी, इंग्रजी,मराठी, तमिळ,तेलगू किंवा काही इतर भाषेत आणि एवढेच नव्हे तर त्यासोबत आपण इथे इमेजेस पण जोडू शकतो आणि यामुळेच आपला ब्लॉग हा क्रिएटिव्ह बनत असतो

ब्लॉगिंग कोण करू शकतो ?

तर मित्रांनो आता आपल्याला प्रश्न पडत असेल की ब्लॉगिंग नेमकं कोण करू शकतो त्यासाठी काही स्पेशल आणि नवीन काही शिकण्याची गरज असते का किंवा त्यासाठी काही खर्च येतो का ?तर त्याचे उत्तर आहे मित्रांनो ब्लॉगिंग हे कोणीही करू शकतो जसे की विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, किंवा आपण जॉब करत असाल तरीही ब्लॉगिंग करू शकता.

ब्लॉगिंग करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात ?

  तर मित्रांनो ज्यांच्याकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल आहे असे सर्व व्यक्ती हे ब्लॉग बनवू शकतात.

ब्लॉगिंग करताना या चुका टाळा .

मित्रांनो ब्लॉगिंग करताना आपल्याला   खालील गोष्टीची काळजी घ्यायची आहे 

1) आपल्या ब्लॉगचा कंटेंट हा कॉफी-पेस्ट नसला पाहिजे. जर आपला ब्लॉग कॉपी पेस्ट असेल तर गुगल वर रँक होणार नाही.


2) आपल्या ब्लॉगच्या कंटेंट मध्ये कमीत कमी 700 ते 1000 शब्द असतील असे ब्लॉग लिहा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)